Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘लोकराज्य’चा जून महिन्याचा अंक प्रकाशित

मुंबई :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य‘ या मासिकाच्या जून-2022 महिन्याच्या समतान्यायएकात्मतेच्या मार्गावर…माझा महाराष्ट्र’ या सामाजिक न्याय विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनाउपक्रमयशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

26 जून हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यात सामाजिक न्यायदिन म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून या विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेली वाटचालबहुजनांचा सर्वांगीण विकासवंचितांसाठी  योजनाकल्याणकारी महामंडळेडॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आदी विषयांवरील लेखांचा या अंकात समावेश आहे.  यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या प्रातिनिधिक यशकथाराज्याच्या खरीपपूर्व हंगामाचा आढावा व दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या वृत्तांताचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडीवाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

Exit mobile version