Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नव्या प्रकारच्या सैन्य भर्तीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवीन प्रकारच्या सैन्य भर्तीची ‘मिशन अग्निपथ’ योजना जाहीर केली. नवी दिल्लीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ही  घोषणा केली, यावेळी भुसेंना, नौसेना आणि वायुसेना या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित होते. या योजनेत भर्ती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असं खास नाव दिल जाणार असून त्यासाठी प्रवेशाची वयोमर्यादा साडे सतरा वर्षांपासून २१ वर्षांपर्यंत असेल, तसंच अग्नीवीर म्हणून झालेली निवड चार वर्षांसाठी असेल, अशी  माहिती सैनिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. भारतीय सैन्याचे सरासरी वय सध्या ३२ वर्षांचे आहे, या मिशन अग्निपथ मुळे ते वय २४ ते २६ वर्षांपर्यंत कमी होईल आणि सैन्यात तंत्रकुशल तरुण सैनिकांचं प्रमाण वाढेल, असं ते म्हणाले. ४ वर्षांची नियुक्ती संपल्यावर या अग्निवीरांपैकी २५ टक्के वीरांना सैन्यदलात कायमस्वरूपी सामावून घेतलं जाईल, असं ते म्हणाले. जगभरातील अनेक देशांचा अभ्यास करून हि योजना तयार केली आहे. येत्या काळात भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल आणि या नवीन योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रतीचा रोजगार उपलब्ध होईल, असं ते पुढे म्हणाले.

Exit mobile version