चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली होती. मात्र काल नवी दिल्लीच्या चीनच्या दूतावासानं आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून व्हिजा प्रक्रिया पुन्हा सुरू केल्याची माहिती दिली. चीनमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता व्हिजासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, चीनच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल की नाही याबद्दलची स्पष्टता चीनने दिलेली नाही. पर्यटन आणि इतर खासगी कामांसाठीच्या व्हिजा अर्जावरही अद्याप बंदी आहे.