राहुल गांधी यांची दुसऱ्या दिवशीही नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालय आज दुसऱ्या दिवशीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करत आहेत. ईडीनं गांधी यांची काल तब्बल दहा तास चौकशी केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ईडीमार्फत राहुल गांधी यांच्या चौकशीची टीका केली. कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे काँग्रेस निदर्शन करत असल्याच चिदंबरम म्हणाले. जर ईडी कायद्याप्रमाणे चालत असेल तर त्यात काही गैर नाही पण ईडी कायद्याचं पालन करत नाही आहे असा आरोप त्यांनी केला.