राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जारी होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज २९ जूनपर्यंत भरता येतील. १८ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल, तर मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर असेल.