सरकारी खात्यांमध्ये १० लाख लोकांची भर्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे असोचॅमकडून स्वागत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दीड वर्षात सरकारी खात्यांमध्ये १० लाख लोकांची भर्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात असोचॅम ने स्वागत केलं आहे.
हा निर्णय दूरदर्शी आणि प्रेरणादायी असून प्रधानमंत्री मोदी यांनी रोजगार निर्मितीसारख्या महत्वाच्या मुद्दयाकडे लक्ष दिल्याबद्दल आनंद झाल्याचं असोचॅम चे अध्यक्ष सुमंत सिंह यांनी म्हटलं आहे.
या निर्णयामुळे सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरून निघण्यास मदत होईल, आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना आशेचा किरण दिसेल असं ते म्हणाले.