WHO पुढील आठवड्यात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का? याचा निर्णय घेण्यासाठी जागतिक आऱोग्य संघटना पुढच्या आठवड्यात तातडीची बैठक घेणार आहे. या संघटनेकडून दिला जाणारा हा सर्वात गंभीर इशारा आहे.
सध्या फक्त कोविड आणि पोलिओ या दोनच आजारांबद्दल असा इशारा लागू आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव हा असामान्य आणि चिंताजनक असल्याचं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसुस यांनी म्हटलं आहे.