पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या विषयावर आधारित परिषदेत ते बोलत होते. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. त्याबरोबरंच पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या हरित हायड्रोजनचा जास्तित जास्त वापर वाढावा यावर केंद्र सरकारचा भर आहे. तसंच बायोतंत्रज्ञानाचा वापर करुन बायोमासचं उत्पादन वाढवण्यावर भर द्यायला हवा, बायोमास वापरुन आपण बायो- इथनॉल, बायो एलएनजी, बायो सीएनजी तयार करू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.