Site icon साप्ताहिक एकच ध्येय

युरोपीय नेत्यांचा युक्रेनला पाठिंबा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय नेत्यांनी काल युक्रेनमधल्या कीवमध्ये राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला पाठिंबा दर्शवला. युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यासाठी कीवच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चांसलर ओलाफ शूल्झ आणि इटली प्रधानमंत्री मारियो द्राघी यांनी झेलेन्स्की यांच्यासमवेत संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी सतत संबंध ठेवल्याबद्दल फ्रान्स, जर्मनी आणि इटलीला टीकेचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version