Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पायाभूत सुविधांच्या विकासात गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इनोव्हेशन बँक स्थापन करण्याचा नितीन गडकरी यांचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांच्या विकासात ‘गुणवत्तेवर’ लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन कल्पना, संशोधनातील माहिती आणि तंत्रज्ञानासाठी इनोव्हेशन बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला आहे. इंडियन रोड्स काँग्रेसच्या २२२ व्या मध्यावधी बैठकीच्या उद्घाटन समारंभात ते काल मुंबईत बोलत होते.

आयआरसीने आयआयटी आणि जागतिक संस्थांच्या मदतीने जागतिक दर्जाची अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित केली पाहिजे, असं ते म्हणाले. भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्यात पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या ८ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी २०१४ मधील ९१ हजार किलोमीटरवरून ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढून आता सुमारे १ लाख ४७ हजार किलोमीटर झाली आहे. २०२५पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं जाळं २ लाख किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र सरकार समर्पितपणे काम करत आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version