केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं उद्घाटन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे १ हजार खाटांचे मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालय आहे, जे २१ एकरात पसरलेले आहे आणि जिथं निसर्गोपचाराद्वारे उपचार केले जातात.
यावेळी बोलतांना शहा म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हजारो लोकांना स्वस्त दरात उपचार देणार आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. हे देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतलेल्या हजारो लोकांना प्रेरणा देईल, असं ही त्यांनी सांगितलं.