प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाणिज्य भवन आणि निर्यात पोर्टलचं उद्धघाटन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला सराकरची कोणतीही योजना सहजरीत्या उपलब्ध असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत केंद्राय वाणिज्य मंत्रालयाच्या नव्याने उभारलेल्या वाणिज्य भवन इमारतीचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. सरकार उभारत असलेली प्रत्येक पायाभूत सुविधा ही करदात्यांप्रति आदराची निदर्शक आहे असं ते म्हणाले. अभिनवतेच्या क्षेत्रात देश नवनवीन शिखरं गाठत असून सर्वांच्या विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करीत आहे याचा उल्लेख त्यांनी केला. आयात निर्यातीच्या वार्षिक नोंदींसाठी सुरु केलेल्या निर्यात या पोर्टलचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. या पोर्टलच्या रूपाने आयात निर्यात क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांना सर्व प्रकारची माहिती एकाच मंचावर सहजगत्या उपलब्ध होणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितलं.