Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जी-सात देशांच्या परिषदेनिमित्त प्रधानमंत्रींनी घेतली अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-७ देशांच्या परिषदेनिमित्त जर्मनीत असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटीनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडेझ यांची म्युनिक इथं भेट घेतली. उभय देशातले वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने त्यांची चर्चा झाली. मोदी यांची या दौऱ्यातली ही पहिलीच द्विपक्षीय भेट होती. भारत अर्जेंटीनाचा चौथ्या क्रमांकाचा वाणिज्यिक भागीदार आहे. जी-सात देशांच्या परिषदेला काल जर्मनीत प्रारंभ झाला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जर्मनीत जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार आहे. यावेळी महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होईल, असं ट्विट त्यांनी केलं आहे. आज त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रेंफोसा यांचीही भेट घेतली. त्यानंतर ते इंडोनेशियाचे अध्यक्ष आणि जर्मनीच्या चान्सलरसोबत चर्चा करतील. कॅनडाचे प्रधानमंत्री आणि युरोपियन आयोगाचे अध्यक्ष यांच्याशीही त्यांची चर्चा प्रस्तावित आहे.

Exit mobile version