वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता – पियुष गोयल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत तिरुपूर इथं काल ते वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या उद्योजकांशी बोलत होते. येत्या पाच वर्षात 10 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं उद्दिष्ट असून या रोजगार निर्मितीत वस्त्रोद्योगाचा क्रमांक शेतीच्या खालोखाल लागतो असं गोयल म्हणाले.