Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे : पुणे जिल्हा ग्रामीणमधील 13 तालुक्यातील 357 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा  जाहीरनामा 1 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

जाहीरनाम्यातील सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत  संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज  1 जुलै  ते  31 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत करता येतील आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.

Exit mobile version