Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री पदाची भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द

एकनाथ शिंदे १९८० च्या दशकात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत दाखल झाले. शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ४० दिवस तुरुंगवास सोसावा लागला होता. १९९७ मधे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१ ते २००४ या काळात ते महानगरपालिकेचे सभागृह नेते होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले. त्यानंतर वर्षभरात दीघे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमधे ते सातत्यानं निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर अल्पकाळ विधानसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांनी मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधे ते नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

Exit mobile version