डीआरडीओ विमानांची चाचणी कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या पूर्णपणे स्वयंचलित लढाऊ विमानांची चाचणी आज कर्नाटकात चित्रदुर्ग इथं यशस्वी झाली. ही वैमानिकरहित विमानं पूर्णपणे स्वदेश निर्मित आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, स्वयंचलित विमानांच्या निर्मितीच्या संदर्भात मिळालेले हे मोठे यश असून, यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणांच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर भारता’ची उभारणी करण्याचा मार्ग यातून मिळेल.