पुणे महापालिका प्रशासनाचा पाणी कपात करण्याचा निर्णय
Ekach Dheya
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात मिळून अडीच टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाची बैठक होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला.