Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचं विविध घटकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी विविध घटकांना आमंत्रित केलं आहे. यासाठी ऑनलाईन जनमत सर्वेक्षण सुरु करण्यात आलं असून या सर्वेक्षणाद्वारे राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल. २३ भाषांमध्ये होत असलेल्या या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ, खासगी संस्था, लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशातल्या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं जुलै २०२० मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केलं होतं

Exit mobile version