जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची इंडोनेशियातील बाली इथं आजपासून बैठक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात बाली इथं आजपासून जी २० राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होणार आहे. अधिक शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगाची एकत्रित उभारणी ही या बैठकीची संकल्पना आहे.
ही बैठक दोन सत्रा होणार असून पहिल्या सत्रात जागतिक पातळीवर स्थैर्य, शांतता आणि विकासासाठी आपापसात विश्वास निर्माण करणं यासाठी एकत्र पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा होईल. तर दुसऱ्या सत्रात अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसाठी धोरणात्मक उपाययोजनांवर विचारविनिमय केला जाईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.