नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं गेले आहेत. एक तास झालेल्या या चर्चेत सीमेवरच्या स्थितीशी संबंधित प्रलंबित मुद्यांवर भर होता, असं ट्विट जयशंकर यांनी केलं आहे. विद्यार्थी आणि विमानसेवेसह इतर विषयांवरही चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि तिच्या परिणामांबाबत दोन्ही नेत्यांनी आपापली मतं मांडली.
या दौऱ्यात जी-ट्वेंटीचे सदस्य आणि इतर आमंत्रित देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही द्विपक्षीय चर्चा अपेक्षित असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.