विवो इंडिया कंपनीने कर चुकवण्यासाठी ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाची माहिती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विवो इंडिया या मोबाईल उत्पादक कंपनीने कर चुकवण्यासाठी २०१७ ते २०२१ या काळात ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली आहे. या घोट्याळ्यात सहभागी असलेल्या १८ कंपन्यांनी विवो इंडियाला एकूण उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम भारताबाहेर पाठण्यासाठी मदत केली असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत या कंपन्यांच्या ११९ बँक खात्यांमधील ४६५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.