Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सूरांच्या सुगंधात रमले पिंपळे गुरव

????????????????????????????????????

पिंपरी : पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडर बाॅय पृथ्वीराज यांची ” सुगंध सुरांचा ” ह्या शास्त्रीय संगीत गायन मैफलीचे आयोजन, पृथ्वीराज थिएटर्स तर्फे दि. 11 ऑक्टोबर 2019 रोजी संध्याकाळी 5 वा. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, पुणे येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नामवंत कलावंत व रसिक यांनी भरभरून दाद दिली. दीपप्रज्वलन पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पंडित श्रीनिवास जोशी, प्रविण तुपे विकास अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पंडित हेमंत पेंडसे जेष्ठ शास्त्रीय संगीत गायन गुरू, पंडित नंदकीशोर कपोते प्रख्यात कथ्थक नर्तक  यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार दया इंगळे, विजय बांदिवडेकर, स्वाती शहा, राजकुमार सुंठवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी  श्री हर्डीकर म्हणाले ‘परिस्थिती किती ही कठीण असली तरी निरंतर प्रयत्न केल्यास जिवन आनंदात जगण्यासाठी मार्ग मिळतो हे पृथ्वीराज व त्यांचे पालक यांचे कडे बघून खात्री पटते.’
नंतर विषेश गायक वंडर बाॅय पृथ्वीराज ने तबला- प्रज्वल दराडे, संवादिनी- गिताराम दराडे, तानपुरा- रोहित चौधरी
यांच्या साथीने संध्याकाळी विशेषतः गायला जाणारा राग यमन, बडा ख्याल व यमन रागात मध्यलय, बडा ख्याल व दृत बंदिश,तसेच यमन रागातील सरगम, तराना आणि यमन रागातील बेदम तिहाई सादर केली. व नंतर नाट्यगीत राधा धर मधुमिलिंद जय जय हे सादर केले.
त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी यांनी मारवा राग गायला व देव विठ्ठल तिर्थ विठ्ठल हे सुरेल भजन सादर केले. त्यांना साथ
संवादिनी- गंगाधर शिंदे, तबला- सचिन पावगी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या ऊत्तरार्धात गायक- विराज जोशी यांनी राग मारूबिहाग सादर केला व भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.
निवेदन व आभार डाॅ  बिना शहा यांनी केले.
Exit mobile version