राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं उद्घाटन आाज विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं.
यानंतर ते बोलत होते. कायद्याचं राज्य आणि न्याय प्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. या विद्यापीठानं स्वतःच्या जबाबदारीवर तसंच शासनाच्या मदतीनं विद्यापीठाचं विस्तारीकरण करून या विधी विद्यापीठाला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विधी विद्यापीठाच्या आतापर्यंत झालेल्या विकासाचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजेंदर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.