स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जहाजाच्या जलावतरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितल आहे.
विक्रांतची निर्मिती आणि बांधणी भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्याकडून करण्यात आली आहे. या जहाजामध्ये ७६ टक्क्याहून जास्त स्वदेशी उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे.