एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात ट्विटर एलन मक्स यांच्या विरोधात खटला दाखल करणार आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करारात फसवणूक झाल्याचा आरोप करत हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.