Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं शिवसेनेच्या बहुसंख्य खासदारांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका शिवसेनेच्या बहुसंख्य खासदारांनी मांडली आहे. यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या भूमिका मांडतील अशी माहिती शिवसेना गजानन किर्तीकर यांनी दिली आहे. खासदारांच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीला ४ खासदार गैरहजर होते. मात्र त्यामागे नाराजी हे कारण नसल्याचा दावा त्यांनी केला.

Exit mobile version