Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील जिल्हे, तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे इथं मुसळधार पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भामरागड, अहेरी आणि सिरोंचा इथले कित्येक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीचा तातडीचा दौरा केला. दरवर्षी पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

Exit mobile version