१८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा विनामूल्य
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा उद्यापासून पुढच्या ७५ दिवसांपर्यंत विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. या केंद्राच्या निर्णयाला राज्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला असून, हे अभियान परिणामकारकतेनं राबवले जाईल, असं त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.