आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करावा – अर्जुन मुंडा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करायचं आवाहन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे. आदिवासी समुदायांच्या उत्थानासाठी पालघरमध्ये आयोजित मंथन शिबीराचं आज मुंडा यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या शिबीरात विविध राज्यांचे आदिवासी व्यवहार मंत्री, मुख्य सचिव, तसंच ज्या राज्यांमध्ये आदिवासी संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे तिथले संचालक सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास कसा करता येईल यावर या शिबीरात चर्चा झाली. तसंच सरकारच्या वतीनं आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहितीही दिली गेली. या शिबीराला उपस्थित विविध राज्यांच्या प्रतिनिधिंनी आपापल्या राज्यातल्या यशोगाथांचं चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केलं.