देशातल्या शिक्षणसंस्थांच्या मानांकनात आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शैक्षणिकसंस्थांची मानांकनं आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली. त्यात आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी चेन्नई सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था ठरली आहे. विविध प्रकारातल्या उत्कृष्टता क्रमवारीत राज्यातल्या मुंबई, पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठासह २२ संस्थांनी स्थान मिळवलं आहे. मुंबईची रसायन तंत्रज्ञन संस्था अठ्ठाविसाव्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय शिक्षण संस्थांमधे वर्ध्याची दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आणि कराडचं कृष्णा आयुर्विज्ञान संस्था या अभिमत विद्यापीठाला मानांकन मिळालं आहे. कायद्याचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमधे पुण्याचं सिम्बायॉसिस लॉ-स्कूल तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय नागपूरची विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था, डी वाय पाटील विद्यापीठ, यांना मानांकन मिळालं आहे. महाविद्यालय गटात पुण्याचं फर्गसन, आणि मुंबईची निर्मला निकेतन आणि सेंट झेवियर ही महाविद्यालयं पहिल्या १०० क्रमांकांमधे आहेत.