Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिशा निर्देश जारी केले. नागरिकांनी परदेशातून आलेल्या, त्वचा अथवा  जननेंद्रियांवर जखमा असणाऱ्या  तसंच  आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा. उंदीर, खार असे  छोटे सस्तन प्राणी आणि वानर प्रजातींसारख्या जंगली जनावरांचा संपर्क टाळावा असं यात म्हटलं आहे.आफ्रिकेमधल्या जनावरांपासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांचा उपयोग करू नये, आरोग्य सेवा आस्थापनांमधल्या आजारी व्यक्तींच्या अथवा संसर्गित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींच्या वापरातल्या साहित्याशी  संपर्क टाळावा असं यात म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीला ताप आणि शरीरावर  लाल पुरळ यासारखी मंकी पॉक्स आजार सदृश  लक्षणं आढळून आली तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसंच ज्या व्यक्ती मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशात जाऊन आले आहेत आणि या आजाराचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी देखील जवळच्या आरोग्य केंद्रात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version