देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांना ई संजीवनी या दूरध्वनी सल्ला उपक्रमाचा लाभ मिळाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत रुग्ण डॉक्टरांशी तसंच विशेषज्ञांशी दररोज दूरध्वनीच्या माध्यमातून चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
विशेषतः ग्रामीण भागात ई संजीवनी सेवेमुळे खूप मोठा लाभ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ई-संजीवनी हे डिजिटल आरोग्यसेवेचं उत्तम उदाहरण असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे.