नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या पंजतानी इथं सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. या भागातल्या हवामानात सुधारणा झाल्यावरच इथून यात्रा पुढे सुरू करण्यात येईल. दरम्यान काल संध्याकाळपर्यंत एक लाख ७२ हजार तेरा भाविकांनी अमरनाथ पवित्र गुहेतील शिवलिंगमला भेट दिली होती.