Site icon साप्ताहिक एकच ध्येय

काळ्या समुद्रातील बंदरांवरुन धान्याच्या निर्यातीसाठी युक्रेन आणि रशियादरम्यान करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काळ्या समुद्रातील नाकेबंदी केलेल्या बंदरांमधून लाखो टन धान्य निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित करारावर युक्रेन आणि रशियानं स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आपत्तीजनक जागतिक अन्न संकटाचा धोका टळला आहे.

इस्तंबूलमध्ये झालेल्या स्वाक्षरी समारंभात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक महिन्यांच्या तणावपूर्ण वाटाघाटींमध्ये गुटेरेस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हा करार युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात अन्न निर्यातीचा मार्ग खुला करेल आणि विकसनशील जगातील समांतर अन्न आणि आर्थिक संकट दूर करेल अशी आशा गुटेरेस यांनी व्यक्त केली.

Exit mobile version