Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे  संघटनेनं स्पष्ट केलं आहे. मंकीपॉक्सच्या उद्रेकाचा आढावा घेण्यासाठी संघटनेनं आयोजित केलेल्या आपत्कालीन समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर ही आणीबाणीची घोषणा केली. संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संक्रमणामुळं जगभरातल्या ७५ देशांमधले १६ हजारांहून अधिक लोक बाधित झाले असून त्यापैकी ५ जण मृत पावले आहेत. दरम्यान देशातल्या मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता चार झाली आहे.

Exit mobile version