Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख घरकुलांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१५ मधे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी २२ लाख घरं सरकारनं मंजूर केली आहेत.

सर्वांसाठी घरे या संकल्पनेसह सर्व लाभार्थ्यांना पक्की घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु केली असल्याचं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी सांगितलं. त्यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ६१ लाखांहून अधिक घरं पूर्ण झाली असून, लाभार्थ्यांना ती सोपवण्यात आली आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version