भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२ कोटी रुपये किमतीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळं देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळाली आहे.
नियंत्रण रेषेवर आणि प्रत्यक्ष युद्ध सदृश परिस्थितीत असलेल्या आपल्या सैन्याचं छुप्या शत्रूपासून संरक्षण करण्याच्या वाढत्या गरजेचा विचार करून, या परिषदेनं जवानांसाठी अत्याधुनिक बुलेट प्रूफ जाकीट खरेदी करण्याचेही प्रस्ताव मान्य केले आहेत.