Site icon साप्ताहिक एकच ध्येय

२०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि रशियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियानं निर्णय घेतला आहे. मॉस्कोची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे नवनियुक्त प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी काल हा निर्णय जाहीर केला.

रशिया आणि अमेरिका यांनी १९९८ पासून अंतराळ कक्षेत एकत्रित काम केलं आहे. युरी बोरिसोव्ह यांनी पुतीन यांना सांगितलं की, जरी अंतराळ स्थानक सोडण्याचा निर्णय झाला असला तरी अंतराळ कार्यक्रमाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

१९६१ मध्ये पहिल्यांदा माणसाला अंतराळात पाठवणं आणि चार वर्षांपूर्वी पहिला उपग्रह प्रक्षेपित करणं ही सोव्हिएत अंतराळ कार्यक्रमाच्या कामगिरींपैकी प्रमुख एक कामगिरी आहे. तसंच अंतराळ कार्यक्रम हा रशियामध्ये राष्ट्रीय अभिमानाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो.

नासातर्फे अजूनपर्यंत या घोषणेवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तर अमेरिकेच्या स्टेट विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी या घोषणेला दुर्दैवी निर्णय असं म्हटलं आहे.

Exit mobile version