भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात त्रिपक्षीय बैठक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं काल भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीची त्रिपक्षीय बैठक झाली. तिन्ही देशांतर्फे इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यात आली. सागरी सुरक्षा, मानवतावादी सहकार्य आणि आपत्ती निवारण, ब्लू इकॉनॉमी, प्रादेशिक जोडणी, बहुपक्षीय मंचांमध्ये सहकार्य, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा, नवोपक्रम आणि स्टार्टअप, पुरवठा यासह त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा आणि संभाव्य क्षेत्रांचा शोध घेण्यात आला. साखळी लवचिकता , सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांचं परस्परांशी सहकार्य यावरही चर्चा झाली. भारताचं नेतृत्व विदेश मंत्रालयाचे सचिव संदीप चक्रवर्ती यांनी केलं.