Site icon साप्ताहिक एकच ध्येय

२०२४ पर्यंत देशात अमेरिकेच्या तोडीचे रस्ते तयार होतील, असा केंद्रीय परिवहन मंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात २०२४ पर्यंत अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील असं वक्तव्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. मजबूत रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देशातील विविध भागांना जोडणारे २६ हरित महामार्ग बांधले जात आहेत.

हे महामार्ग दिल्लीला जयपूर, चंदीगड, हरिद्वार, अमृतसर, मुंबई, कटरा, श्रीनगर आणि वाराणसी ते कोलकाता या शहरांना जोडतील. या  महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  तसचं देशात रस्ते पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची कमतरता नसल्याचंही ते बोलले.

Exit mobile version