राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळानं मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
मराठवाडा तसंच विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून, याची तातडीनं पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी, या निवेदनात करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नसल्याकडेही या पत्रातून लक्ष वेधण्यात आलं आहे. राज्यपालांनी याबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.