मुंबई : ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर 2019 च्या महात्मा गांधी यांचेवरील ‘युगपुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, प्रबंध संपादक अजय अंबेकर, संपादक सुरेश वांदिले आदी उपस्थित होते.
या विशेषांकात गांधीजींच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला आहे. व्रतस्थ कर्मवीर, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठेचा आदर, वैज्ञानिक वारकरी, स्वच्छतेचा उपासक, राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंत, आहारतज्ज्ञ यासारख्या लेखांतून गांधीजींच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘तुम्ही गांधीजींना किती ओळखता?’ भागामध्ये गांधीजींच्या जीवनप्रवासावर आधारित 150 प्रश्नोत्तरे देण्यात आली आहेत. गांधीजींचा संक्षिप्त जीवन परिचय आणि महात्मा गांधीजींची दुर्मिळ छायाचित्रे ही या अंकाची वैशिष्ट्ये आहेत. 68 पृष्ठांच्या या अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.