Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरीक्षकांचे आवाहन

मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 4 शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या 4 शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळा

  1. मदर तेरेसा स्कूल, ब्लॉक नंबर 12,राजीव गांधी नगर, ट्राँझिट कँप, 90फुटरोड, धारावी, मुंबई- 17
  2. एन.आय.ई.एस. इंग्लिश सेकंडरी स्कूल, धारावी ट्रांझिट कँप, न्यू स्कूल कम्पाऊंड, धारावी, मुंबई- 17
  3. छबिलदास प्राथमिक शाळा, (सी.बी.एस.ई.बोर्ड), दादर(पश्चिम),मुंबई- 28
  4. मदनी हायस्कूल, 1 ला मजला,साबू सिद्दीकी मुसाफिरखाना, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई
Exit mobile version