Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत आहे.

दारेस्लाम येथे 14 तर झांझीबार येथे 15 ते 17 ऑक्टोबरला हा ताफा राहील.

भारतीय नौदलाची पहिली प्रशिक्षण तुकडी कोची स्थित आहे. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि मित्र देशांच्या अधिकाऱ्यांना ही तुकडी प्रशिक्षण देते. प्रशिक्षणात नेव्हीगेशन, जहाज हाताळणी, अभियांत्रिकीचा समावेश आहे

Exit mobile version