२०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध- डॉ. जितेंद्र सिंह
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सन २०३० पर्यंत एकूण हरितगृह वायूंचं उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. एकात्मिक धोरण निर्मिती सक्षम करण्याच्या प्रणाली विश्लेषणावर नवी दिल्ली इथं आयोजित तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
भारत २०३० पर्यन्त जीवाश्म इंधनावरचं आपलं अवलंबित्व एकंदर वापराच्या ५० टक्क्यांनी कमी करत असून, भारत आपल्या अद्वितीय भौगोलिक-हवामान परिस्थितीमुळे पारंपारिकरित्या नैसर्गिक आपत्तींसाठी असुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.