प्रधानमंत्री शहरी आवास योजना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घर मोहिम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत मंजूर झालेली १ कोटी २२ लाखापेक्षा जास्त घरं पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध केलं जात आहे.
देशाच्या शहरी भागात सर्व पात्र लाभार्थ्यांना पक्क घरं देण्याची ही योजना केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. ती चालू ठेवण्याचा आग्रह राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी केला होता. या योजनेसाठी २००४ ते २०१४ पर्यंत २० हजार कोटी रुपयांचं केंद्रीय अर्थसहाय्य दिलं होतं. २०१५ पासून २ लाख ३ हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केलं आहे.