केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केलं पालकत्व ॲपचं लोकार्पण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं. बालकांसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून, या दरम्यान बालकांची शारिरिक, बौद्धिक वाढ होत असते. या ॲपच्या माध्यमातून पालकांना यासंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, देशात बालमृत्यू दर कमी करण्यात वेगानं पावलं उचलली जात आहेत. २०१४ पासून ते २०१९ पर्यंत बाल मृत्यू दर हा दर हजारी ३५ एवढा कमी झाला असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.