Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातल्या 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात सरकारला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात पाणी टंचाई हा मोठा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र सरकार गेली आठ वर्ष जल सुरक्षा प्रकल्पांवर काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. आम्ही राष्ट्र उभारणीचं काम हाती घेतलं आहे म्हणूनच आम्ही वर्तमानातल्या आव्हानांबरोबरच भविष्यातील आव्हानं लक्षात घेऊन काम करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले.

जल जीवन मिशनच्या पणजी इथल्या हर घर जल उत्सव कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. देशात 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती मोदी यांनी यावेळी दिली.

गोवा राज्यानं केलेल्या कामगिरीचा गौरव करताना ते म्हणाले. दादरा नगर हवेली एवं दीव और दमन दीव हर जल सर्टिफाइड केंद्रशासित प्रदेश बन गए हैं। बीते कुछ वर्षों में देश के हर बड़े मिशन में गोवा अग्रणी भूमिका निभाता जा रहा है। गोवा की जनता जीस प्रकार हर घर जल मिशन को आगे बढाया हैं वह पूरे देश को प्रेरीत करनेवाला हैं।

Exit mobile version