नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच भारतीय नौदलानं आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावरून ही चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान भारतीय नौदलाच्या नौकेवरून स्वदेशी बनावटीचं हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यानं आकाशातील वेगवान लक्ष्याचा अचूक भेद केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल सर्व संबधितांचं अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलाची आकाशातील विविध अस्त्र नेस्तनाबूत करण्याची क्षमता वाढणार असल्याची माहिती डीआरडीओचे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी दिली आहे.